दैनंदिन जीवनात आपण सतत काहीना काही क्रिया करत असतो. दिवस भर खाणे,पिणे,झोपणे,चालणे ,बोलणे ,ऐकणे ,गाणे ,बघणे अश्या अनेक क्रिया करत असतो .रात्री झोपल्यावर सुद्धा आपण "झोपणे" हि क्रिया करत असतो. व्याकरणाच्या दृष्टीने वाक्यात क्रिया "क्रियापदाने" दाखवल्या जातात. क्रियापद ती क्रिया करणाऱ्या कर्त्याचे लिंग ,वचन आणि क्रियेचा काळ दर्शवतात
उदाहरणार्थ - मुलगा खातो - पुलिंगी एकवचनी कर्ता खाण्याची क्रिया करतो.
गायिका गातात -स्त्रीलिंगी अनेकवचनी कर्ता गाण्याची क्रिया करतात
मुलगा हसतो ,मुलगी चालते ,तो खातो ,ती पिते ,गायक गातो , शिक्षक शिकवतात या सगळ्या वर्तमानकाळ वाचक क्रिया आहेत.आपण याच क्रिया संस्कृत मध्ये पाहूयात.
जेव्हा प्रथम पुरुष एकवचनी कर्ता ( तो, हा,मुलगा ,गायक,विद्यार्थी थोडक्यात "मी आणि "तू " सोडून बाकीचा ) क्रिया करत असतो (वर्तमानकाळ ) तेव्हा आपण "ति" हे प्रत्यय लावतो.
उदाहरणार्थ - बालक: खादति | (मुलगा खातो)
युवक: पिबति | (तरुण पितो)
स: लिखति | ( तो लिहितो)
छात्र :पठति | ( विद्यार्थी वाचतो )
राम: उपविशति |(राम बसतो )
असा कर्ता स्त्रीलिंगी जरी असला (मुलगी,ती ,हि ,गायिका ,विद्यार्थिनी ) तरी सुद्धा क्रियापद सारखेच राहते.
उदा: बालिका खादति(मुलगी खाते )
गायिका गायति (गायिका गाते )
सीता गच्छति (सीता जाते )
सा लिखति (ती लिहिते )
सिता स्विकरोति (सिता घेते )
म्हणजे मराठीत जसं कर्त्याच्या लिंगाप्रमाणे क्रियापदाच लिंग बदलते - मुलगा खातो ,मुलगी खाते.
तसं इथे होत नाही [बालक: खादति |, बालिका खादति]
नपुंसकलिंगी कर्त्यासाठी सुद्धा क्रियापद सारखेच राहते.
आपण आपल्या सोई साठी तू या अर्थाने भवान (M) आणि भवति ( F) हे सर्वनाम वापरणार आहोत. त्यांच्यासाठी पण क्रियापदे हीच राहतात. ( खाली दिलेली टीप -१ पहा )
उदा -
भवान खादति| (तू खातोस )
भवति खादति| (तू खातेस )
भवान हसति | (तू हसतोस)
भवान गच्छति |(तू जातोस )
भवति पठति (तू वाचतेस )
थोडक्यात काय तर तू, तू हा ,हि,हे ,तो ,ती,ते मुलगा ,मुलगी ,पुरुष ,महिला , गायक ,गायिका , आई -बाबा ....
या सगळ्यांच्या वर्तमानकाळ वाचक क्रियांसाठी सारखीच क्रियापदे असतात.
तू खातोस भवान खादति |
तू खातेस भवति खादति |
तो खातो स:खादति |
ती खाते सा खादति |
ते खाते तत् खादति |
हा खातो एष: खादति |
हि खाते एषा खादति |
हे खाते एतत् खादति |
मुलगा खातो बालक:खादति |
मुलगी खाते बालिका खादति |
सराव १ -: खाली दिलेल्या वाक्यांचे संस्कृत मध्ये भाषांतर करा
१) तो हसतो
२)हि रडते
३) मुलगा लिहितो
४) तू पितोस
५) तू वाचतेस
६)गायिका गाते
७)हा बघतो
८) ती खेळते
९) विद्यार्थी विचारतो
१०)गणेश घेतो
काही क्रियांसाठी त्यांच्या मुळ क्रियापद वापरण्यापेक्षा त्या क्रिये पुढे "करोति " (करणे) हे क्रियापद वापरल्यास
सोप्पे जाते
उदा
अंघोळ करतो -स्नानं करोति |
जेवतो - भोजनं करोति |
नाचतो -नृत्यं करोति |
पूजा करतो - पूजां करोति |
_______________________________________________________________
टीप १ : तू या अर्थाने (मध्यम पुरुष एकवचन ) संस्कृत मध्ये "त्वम्" हे सर्वनाम आहे. परंतु ते वापरल्यास क्रियापदाची रूपे बदलतात तू खातोस-त्वं खादसि | त्याच प्रमाणे अन्य क्रियांसाठी त्वं गायसि ,त्वं गच्छसि ,त्वं पठसि ... अशी रूपे होतील.
म्हणून आपल्या सोई साठी आपण त्वं ऐवजी भवान /भवती " हे आदरार्थी रूप वापरू शकतो. याचे २ फायदे आहेत एक तर क्रियापदाची रूपे एकच राहतात "खादति,गायति,पठति.... आणि दुसर म्हणजे आदर देखील दिला जातो. भवान खादति म्हणजे रूढ अर्थाने तुम्ही खातात असा होईल.
यात व्याकरण दृष्ट्या चुकीचे काहीही नाही.

No comments:
Post a Comment