text

संस्कृत बद्दल बोलणं खूप झालं...चला आता संस्कृत मधून बोलूयात ....

वदतु संस्कृतम् -६ क्रिया

दैनंदिन जीवनात आपण सतत काहीना काही क्रिया करत असतो. दिवस भर खाणे,पिणे,झोपणे,चालणे ,बोलणे ,ऐकणे ,गाणे ,बघणे अश्या अनेक क्रिया करत असतो .रात्री झोपल्यावर सुद्धा आपण "झोपणे" हि क्रिया करत असतो. व्याकरणाच्या दृष्टीने वाक्यात क्रिया "क्रियापदाने" दाखवल्या जातात. क्रियापद ती क्रिया करणाऱ्या कर्त्याचे लिंग ,वचन आणि क्रियेचा काळ दर्शवतात
उदाहरणार्थ - मुलगा खातो - पुलिंगी एकवचनी कर्ता खाण्याची क्रिया करतो.
                    गायिका गातात -स्त्रीलिंगी अनेकवचनी कर्ता  गाण्याची क्रिया करतात
                   

मुलगा हसतो ,मुलगी चालते ,तो खातो ,ती पिते ,गायक गातो , शिक्षक शिकवतात या सगळ्या वर्तमानकाळ वाचक क्रिया आहेत.आपण याच क्रिया संस्कृत मध्ये पाहूयात.
जेव्हा प्रथम पुरुष एकवचनी  कर्ता ( तो, हा,मुलगा ,गायक,विद्यार्थी  थोडक्यात "मी आणि "तू " सोडून बाकीचा ) क्रिया करत असतो (वर्तमानकाळ ) तेव्हा आपण "ति" हे प्रत्यय लावतो.
उदाहरणार्थ - बालक: खादति |  (मुलगा खातो)
                   युवक: पिबति |  (तरुण पितो)
                 स: लिखति | ( तो लिहितो)
                छात्र :पठति | ( विद्यार्थी वाचतो )
                राम: उपविशति |(राम बसतो )

असा कर्ता स्त्रीलिंगी जरी असला (मुलगी,ती ,हि ,गायिका ,विद्यार्थिनी ) तरी सुद्धा क्रियापद सारखेच राहते.
उदा:  बालिका खादति(मुलगी खाते )
         गायिका गायति (गायिका  गाते )
         सीता गच्छति (सीता जाते )
          सा लिखति (ती लिहिते )
         सिता स्विकरोति (सिता घेते )
म्हणजे मराठीत जसं कर्त्याच्या लिंगाप्रमाणे क्रियापदाच लिंग बदलते - मुलगा खातो ,मुलगी खाते.
तसं इथे होत नाही  [बालक: खादति |, बालिका खादति]
नपुंसकलिंगी कर्त्यासाठी सुद्धा क्रियापद सारखेच राहते.

आपण  आपल्या सोई साठी तू या अर्थाने भवान (M) आणि भवति ( F) हे सर्वनाम वापरणार आहोत. त्यांच्यासाठी पण क्रियापदे हीच राहतात. ( खाली दिलेली टीप -१ पहा )
उदा -
 भवान खादति|      (तू खातोस  )
भवति खादति|      (तू खातेस )
भवान हसति |      (तू हसतोस)
भवान गच्छति     |(तू  जातोस )
भवति पठति       (तू वाचतेस )

थोडक्यात काय तर  तू, तू हा ,हि,हे  ,तो ,ती,ते  मुलगा ,मुलगी ,पुरुष ,महिला , गायक ,गायिका , आई -बाबा ....
या सगळ्यांच्या वर्तमानकाळ वाचक क्रियांसाठी सारखीच क्रियापदे असतात.
तू खातोस       भवान  खादति |
तू खातेस        भवति खादति |
तो खातो         स:खादति |
ती खाते          सा खादति |
ते खाते           तत् खादति |
हा खातो        एष: खादति |
हि खाते         एषा खादति |
हे खाते        एतत् खादति |
मुलगा खातो  बालक:खादति |
मुलगी खाते    बालिका खादति |


सराव १  -: खाली  दिलेल्या वाक्यांचे संस्कृत मध्ये भाषांतर करा 
१) तो हसतो 
२)हि  रडते 
३) मुलगा लिहितो 
४) तू  पितोस
५) तू  वाचतेस
६)गायिका गाते
७)हा बघतो 
८) ती खेळते 
९) विद्यार्थी विचारतो 
१०)गणेश घेतो 

काही क्रियांसाठी त्यांच्या मुळ क्रियापद वापरण्यापेक्षा त्या क्रिये पुढे "करोति " (करणे) हे क्रियापद वापरल्यास 
सोप्पे जाते
उदा 
अंघोळ करतो -स्नानं करोति |
जेवतो - भोजनं करोति |
नाचतो -नृत्यं करोति |
पूजा करतो - पूजां करोति |

_______________________________________________________________


टीप १ : तू या अर्थाने (मध्यम पुरुष एकवचन ) संस्कृत मध्ये  "त्वम्" हे सर्वनाम आहे. परंतु ते वापरल्यास  क्रियापदाची रूपे बदलतात  तू खातोस-त्वं खादसि |   त्याच प्रमाणे अन्य क्रियांसाठी त्वं गायसि ,त्वं गच्छसि ,त्वं पठसि ... अशी रूपे होतील.

म्हणून आपल्या सोई साठी आपण त्वं ऐवजी  भवान /भवती " हे आदरार्थी रूप  वापरू शकतो. याचे २ फायदे आहेत एक तर क्रियापदाची रूपे एकच राहतात "खादति,गायति,पठति.... आणि दुसर म्हणजे आदर देखील दिला जातो.  भवान खादति म्हणजे रूढ अर्थाने तुम्ही खातात असा होईल.
यात व्याकरण दृष्ट्या चुकीचे काहीही नाही.





वदतु संस्कृतम् -४ हा -हि -हे

वदतु संस्कृतम् -३ मध्ये आपण पहिले कि आपल्या पासून लांब असणार्या व्यक्तींसाठी आपण स:(M) /सा(F)  आणि वस्तूंसाठी 'तत"(N) हि सर्वनामे वापरतो.
 जसं  एखादा मुलगा आपल्या पासून दूर असेल तर आपण म्हणून स:बालक: तसं  आपल्या पासून जवळ असणार्या ,आपल्या शेजारी असणार्या मुलाला उद्देशून आपण म्हणू
"एष: बालक:|"
तसेच आपल्या जवळ उभ्या असणार्या  मुलीला उदेशून आपण म्हणू-
"एषा बालिका |"
 आपल्यापासून जवळ असणारे पुस्तक दाखविण्यासाठी म्हणावे लागेल
"तत् पुस्तकम्|"
अर्थातच दूर-जवळ हे व्यक्ती सापेक्ष आहे .किती जवळ आल्यावर एष: म्हणायचं आणि किती दूर गेल्यावर स: म्हणायचं हा काही नियम होऊ शकत नाही. मराठीत जसं आपण  हा/हि हे आणि तो/ती/ते वापरतो त्याच तारतम्यभावाने  एष:/एषा /एतत्   आणि  स:/सा /तत्  हि सर्वनामे वापरावीत.


                                                 

वदतु संस्कृतम् -३ तो -ती -ते

वदतु संस्कृतम् -२ मध्ये आपण पाहिलं कि स्वतः बद्दल काही सांगताना "अहं " (I/ME) वापरले जाते.
आता इतरांविषयी बोलताना कुठले सर्वनाम वापरायचे ते बघुयात.

समजा तुमच्या पासून दूर एखादा मुलगा उभा असेल तर तो कोण हे सांगण्यासाठी म्हणावे लागेल -
"स: बालक:|"
आपल्या पासून दूर असणार्या  पुल्लिंगी व्यक्तीना (बालक:/पुरुष:/गायक:/छात्र:)  दाखवण्या साठी "स:"
या सर्वनामाचा उपयोग होतो.
स: बालक:|-->तो मुलगा        स: छात्र:|  --> तो विद्यार्थी.
 आपल्या पासून दूर उभी असणारी व्यक्ती (पु.) कोण आहे हे विचारण्यासाठी  म्हणावे लागेल
   स: क:?"


वरील चित्रामधील विनय पासून दूर अंतरावर काही व्यक्ती  आहेत. त्यांना एकएकाला उद्देशून तो विचारतो आहे
स: क :?    या प्रश्नाला उत्तर असेल
१) स: वैद्य:  |
२)स: गायक:|
३) स: नर्तक:|
४)स: कृषीवल:|

आपल्या पासून दूर असणार्या  स्त्रीलिंगी  व्यक्तीना (बालिका /महिला /युवती /गायिका )  दाखवण्या साठी "सा"(That)या सर्वनामाचा उपयोग होतो.                             

         "सा शिक्षिका  |"
सा बालिका -ती मुलगी'
सा छात्रा - ती विद्यार्थिनी

आपल्या पासून दूर उभी असणारी व्यक्ती (स्त्री .) कोण आहे हे विचारण्यासाठी  म्हणावे लागेल
               सा का ?

खालील चित्रात विनय पासून दूर अंतरावर काही स्त्रिया आहेत(नर्तकी ,युवती ,गायिका ,वैद्या ). त्यांना एकेकीला  पाहून तो विचारतो आहे "सा का ?"
सांगा बर काय उत्तर असेल?




आपल्या पासून दुर असणार्या नपुसकलिंगी वस्तू ला दर्शविण्यासाठी "तत् " या सर्वनामाचा उपयोग होतो.
आपल्या पासून दूर एखादे फुल ठेवले असेल तर ते दाखवण्यासाठी म्हणावे लागेल -
"तत् पुष्पम् |"
ती वस्तु काय आहे असं विचारण्यासाठी म्हणावे लागेल - तत् किम् ? खाली दिलेल्या चित्रात विनय पासून दूर काही वस्तू आहेत.(कारयानम् ,व्यजनम्,पुष्पम् ,फ़लम् ,पुस्तकम् ) त्यांना पाहून तो विचारतो आहे -" तत् किम?".तुम्ही सांगू  शकाल का उत्तर असेल ते?















शब्दसंग्रह- व्यवसायवाचक शब्द

व्यवसायवाचक शब्द -
१)विद्यार्थी                छात्र:
२)शिक्षक                शिक्षक:
३)डॉक्टर                वैद्य:
४)इंजिनियर            अभियन्ता
५)दुकानदार           आपणिक :
६)वकील                अधिवक्ता
७)सैनिक                सैनिक:
८)पोलीस                आरक्षक:
९)सोनार                स्वर्णकार:
१०)कुंभार               कुम्भकार:
११)लोहार               लोहकार:
१२)पुजारी               अर्चक:
१३)माळी                मालाकार:
१४) न्हावी                नापित:
१५)शिंपि                सौचिक:



अजून काही व्यवसाय वाचक शब्द -
Director            निर्देशक:
Manager           व्यवस्थापक:
C.A.                 महाङ्किक:
Dancer             नर्तक:
Principal          मुख्याध्यापक:
Professor         अध्यापक:
Head of Dept   विभागप्रमुख :
Singer              गायक:


यांचे स्त्रीलिंगी रूप छात्रा ,शिक्षिका ,वैद्या ,गायिका ,नर्तकी,अध्यापिका  अशी होतील

वदतु संस्कृतम् २- मी कोण?

कोSहम ? मी कोण हा अगदी उपनिषद काळापासून पडलेला गहन प्रश्न. तत्वज्ञान जाऊ देऊ पण समाजात वावरताना आपल्याला आपली ओळख सांगावी लागते मी कोण . यात आपले नाव / व्यवसाय /हुद्दा अश्या वेगवेगळ्या ओळखी असू शकतात.
संस्कृत मध्ये स्वताचे नाव सांगण्यासाठी आपण म्हणू शकतो
                                                            "अहं विनय:|"
स्वतः बद्दल आपण अजून सांगू शकतो -अहं बालक:|  /   अहं युवक:|   / अहं वृद्ध:|
महिलांसाठी  अहं  बालिका /युवती/वृद्धा |
व्यवसाय किंवा आपण काय करतो हे सांगण्यासाठी  पण सांगू शकतो
अहं छात्र: (Student )|/ अहं शिक्षक:|(Teacher)  / अहं अभियन्ता|(Engineer) / अहं वैद्य:(Doctor)|
[महिलांसाठी -छात्रा /शिक्षिका /वैद्या ]

एखाद्या पुरुषाला "तुम्ही कोण ?" अस संस्कृतमध्ये विचारण्यसाठी  म्हणावे - 
"भवान क:?"
यावर तो उत्तर देईल अहं आदित्य:|  / अहं छात्र: |   / अहं शिक्षक:|
याचप्रमाणे एखाद्या स्त्रीला तुम्ही कोण असं  विचारण्यासाठी म्हणावे -
"भवति का ?"
यावर उत्तर असेल अहं गीता | / अहं स्नेहा |  /अहं वैद्या |  अहं युवती |
________________________________________________________________
सारांश :
I am _____                       अहं_____|
who are you ? (M)            भवान क:?
Who are you?  (F)           भवति का ?
I                                       अहं
You   (M)                         भवान
You    (F)                         भवति

वदतु संस्कृतम् १- परिचय

"Hello"-इंग्रजी न येणाऱ्या माणूस  सुद्धा फोन वर बोलताना अगदी सहज म्हणतो तो हा शब्द .बर्याच वेळा एखादी भाषा आपल्याला येत नसली तरी तिच्यातले परिचय वाचक शब्द आपल्याला माहित असतात
"केम छो?"  माहित असलायला गुजराथी येण्याची गरज नाही आणि जर्मन येत नसला तरी Guten Morgen  माहित असत .
आज आपण संस्कृत मध्ये परिचय कसा करावा ते पाहूयात

हेल्लो ,हाय यासाठी आपण नमो नम:/ नमस्कार: हे शब्द वापरू शकतो .कोणाचा फोन आल्यास "हरी ओम" अस म्हणू शकतो.
दैनंदिन जीवनातील शुभेच्छा वाचक शब्दांना संस्कृत प्रतिरूप पुढील प्रमाणे
Hello                          नमस्ते /नमस्कार:/नमो नम:
How are you              कथं अस्ति?
Thank You                 धन्यवाद:
Welcome                    स्वागतम्
Excuse me                 क्षम्यताम्
Don't worry               चिन्ता मास्तु
Ok/All right               अस्तु
Please                         कृपया
Sir                              श्रीमान /मान्यवर /महोदय
Madam                       मान्ये /महोदया
Very good                   सम्यक् /उत्तमम् /शोभनम्
Good Morning            सुप्रभातम्
Good evening              शुभसंध्या
Good Night                शुभरात्रि
yes                              आम
no                                न
Bye /See you Later   अस्तु मिलाम:

स्वतःचे नाव सांगण्यासाठी आपण म्हणू शकतो
                                                      "मम नाम विनय:"| (My name is Vinay)
 संस्कृत मध्ये  पुल्लिंगी वस्तूचे किंवा मुलाचे/व्यक्तीचे नाव सांगताना (म्हणचेच प्रथमा विभक्तीत ) नावाच्या शेवटी ":" म्हणजेच विसर्ग लावतात त्याचा उच्चार 'ह' असा करतात .म्हणजेच विनय: चा उच्चार "विनयह " असा होईल . त्याच प्रमाणे तुम्ही तुमचे नाव सांगू  शकतात.
मम नाम आदित्य:/गौरव"/सचिन:/प्रतिक:/..........
स्त्रील्लिंगी वस्तू किंवा महिला/मुली यांच्या नावा पुढे विसर्ग लागत नाही .म्हणजे तुम्ही महिला असला तर तुम्ही नाव सांगाल "मम नाम प्रियांका /स्नेहा / अदिती .............

एखाद्या मुलाला त्याचे नाव विचारण्यासाठी विचारावे -
"भवत: नाम किम् ?"  
त्यावर तो उत्तर देईल  "मम नाम आदित्य:|"(त्याचे नाव आदित्य असेल तर )


 विनय काही लोकांना त्यांचे नाव विचारतो आहे. तुम्ही सांगाल का ती लोक काय काय उत्तर देतील?




 
एखाद्या महिलेला /मुलीला तिचे नाव विचारण्यासाठी विचारावे -
"भवत्या: नाम किम् ?"  
(भवत्या:चा उच्चार भवत्याहा असा होइल) या प्रश्नावर उत्तर येईल मम नाम अनिता/प्रीती /पूजा (जे नाव असेल ते )


 सांगा पाहू या सगळ्या महिला काऊ उत्तर देतील ?






 
            मी तुम्हाला विचारतो 

आता तुम्ही मला सांगा   "मम नाम किम् ?"
_____________________________________________________________________________
सारांश :
My name is____                                       मम नाम___________|
What is your name? (for Masculine )      भवत: नाम किम् ?
What is your name? (for Female)            भवत्या: नाम किम् ?

संस्कृत भाषा

संस्कृत हि