कोSहम ? मी कोण हा अगदी उपनिषद काळापासून पडलेला गहन प्रश्न. तत्वज्ञान जाऊ देऊ पण समाजात वावरताना आपल्याला आपली ओळख सांगावी लागते मी कोण . यात आपले नाव / व्यवसाय /हुद्दा अश्या वेगवेगळ्या ओळखी असू शकतात.
संस्कृत मध्ये स्वताचे नाव सांगण्यासाठी आपण म्हणू शकतो
"अहं विनय:|"
स्वतः बद्दल आपण अजून सांगू शकतो -अहं बालक:| / अहं युवक:| / अहं वृद्ध:|
महिलांसाठी अहं बालिका /युवती/वृद्धा |
व्यवसाय किंवा आपण काय करतो हे सांगण्यासाठी पण सांगू शकतो
अहं छात्र: (Student )|/ अहं शिक्षक:|(Teacher) / अहं अभियन्ता|(Engineer) / अहं वैद्य:(Doctor)|
[महिलांसाठी -छात्रा /शिक्षिका /वैद्या ]

एखाद्या पुरुषाला "तुम्ही कोण ?" अस संस्कृतमध्ये विचारण्यसाठी म्हणावे -
"भवान क:?"
यावर तो उत्तर देईल अहं आदित्य:| / अहं छात्र: | / अहं शिक्षक:|
याचप्रमाणे एखाद्या स्त्रीला तुम्ही कोण असं विचारण्यासाठी म्हणावे -
"भवति का ?"
यावर उत्तर असेल अहं गीता | / अहं स्नेहा | /अहं वैद्या | अहं युवती |
________________________________________________________________
सारांश :
I am _____ अहं_____|
who are you ? (M) भवान क:?
Who are you? (F) भवति का ?
I अहं
You (M) भवान
You (F) भवति
No comments:
Post a Comment