वदतु संस्कृतम् -३ मध्ये आपण पहिले कि आपल्या पासून लांब असणार्या व्यक्तींसाठी आपण स:(M) /सा(F) आणि वस्तूंसाठी 'तत"(N) हि सर्वनामे वापरतो.
जसं एखादा मुलगा आपल्या पासून दूर असेल तर आपण म्हणून स:बालक: तसं आपल्या पासून जवळ असणार्या ,आपल्या शेजारी असणार्या मुलाला उद्देशून आपण म्हणू
जसं एखादा मुलगा आपल्या पासून दूर असेल तर आपण म्हणून स:बालक: तसं आपल्या पासून जवळ असणार्या ,आपल्या शेजारी असणार्या मुलाला उद्देशून आपण म्हणू
"एष: बालक:|"
तसेच आपल्या जवळ उभ्या असणार्या मुलीला उदेशून आपण म्हणू-
"एषा बालिका |"
आपल्यापासून जवळ असणारे पुस्तक दाखविण्यासाठी म्हणावे लागेल
"एतत् पुस्तकम्|"
अर्थातच दूर-जवळ हे व्यक्ती सापेक्ष आहे .किती जवळ आल्यावर एष: म्हणायचं आणि किती दूर गेल्यावर स: म्हणायचं हा काही नियम होऊ शकत नाही. मराठीत जसं आपण हा/हि हे आणि तो/ती/ते वापरतो त्याच तारतम्यभावाने एष:/एषा /एतत् आणि स:/सा /तत् हि सर्वनामे वापरावीत.
No comments:
Post a Comment